मेंढ्या, झेंडेकरी, तुळस, विणेकरी..., डोळ्यांचे पारणे फेडणारे पालखीच्या रिंगण सोहळ्याची दृश्य

मेंढ्या, झेंडेकरी, तुळस, विणेकरी..., डोळ्यांचे पारणे फेडणारे पालखीच्या रिंगण सोहळ्याची दृश्य

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे पहिले गोल रिंगण पुणे जिल्ह्यातील बेलवाडी या ठिकाणी आज सकाळी पार पडले.
Published on

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे पहिले गोल रिंगण पुणे जिल्ह्यातील बेलवाडी या ठिकाणी आज सकाळी पार पडले.

या रिंगणात सर्वप्रथम मेंढ्या धावल्या. त्यांच्यापाठोपाठ पताकावाले, तुळशी वृंदावन आणि पाण्याच्या कळशा डोक्यावर घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पखवाजवाले आणि टाळकरी धावले.

टाळ मृदुंगाचा गजर... तुकारामांचा नामघोष आणि अश्वाच्या दौडीवर खिळलेल्या वैष्णवांच्या नजरा अशा भक्तिमय वातावरणात पहिल रिंगण पार पडले.

रिंगण पूर्ण होईपर्यंत अखंड तुकोबारायांच्या नामाचा जयघोष सुरू होता.

यानंतर पालखी सोहळा बेलवाडीतील मंदिरात विसावला.

दुपारची विश्रांती घेऊन पालखी सोहळ्याने लासुर्णेमार्गे अंथुर्णे या मुक्कामाला प्रस्थान केले.

ही नयनरम्य दृश्य ड्रोम कॅमेराद्वारे टिपण्यात आली आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com