Ashoka Waterfall
Ashoka Waterfall Team Lokshahi

Ashoka Waterfall : मनमोहक कोसळणाऱ्या धबधब्याला अशोका नाव कसे मिळाले? जाणून घ्या...

नाशिक आणि मुंबईच्या जवळ पर्यटक सध्या वन डे पिकनिकसाठी “अशोका” धबधब्याला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या धबधब्याला अशोक नाव कसे मिळाले, त्याची रंजक कथा आहे. मुंबईपासून अंतर जवळपास २०० किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on
Ashoka Waterfall
Ashoka Waterfall Team Lokshahi

साक्षी जाधव

पावसाळ्यात शहापूर तालुक्यातील अनेक ठिकाणे निसर्गसौंदर्यांनी नटली असून कसाऱ्यातील विहीगावजवळ असणारा अशोका धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पुर्वी या धबधब्याल विहीगाव धबधबा असे होते.

Ashoka Waterfall
Ashoka Waterfall Team Lokshahi

2001 मध्ये रिलिज झालेल्या अशोका चित्रपटाचे शुटींग या ठिकाणी झाले होते. बॉलिवू़ड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या अशोका चित्रपटासाठी एक गाणे चित्रित झाले होते. तेव्हापासूनच हा धबधबा ‘अशोका धबधबा’ नावाने ओळखला जाऊ लागला.

Ashoka Waterfall
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'नो ब्लाऊज' लूकमधील बोल्ड फोटो
Ashoka Waterfall
Ashoka Waterfall Team Lokshahi

कसे जावे?

मुंबईकडून नाशिकला येताना इगतपुरीच्या जरा अलीकडे कसारा घाटातील डाव्या बाजूच्या रस्त्याने जव्हार फाटा आहे, तिथून जवळपास सात किमी अंतरावर विहिगाव आणि अशोका धबधबा आहे. मुंबई-नाशिक महामार्गाने कसारा घाटाच्या आधी असलेल्या जव्हार फाट्यावरून विहिगावच्या या धबधब्यावर जाता येते.

Ashoka Waterfall
Ashoka Waterfall Team Lokshahi

प्रवासाची सोय

एसटी किंवा अन्य कुठलीही सार्वजनिक वाहतूक येथे जाण्यासाठी नाही. खाजगी वाहन हाच एकमेव पर्याय आहे. या ठिकाणाहून मुक्कामाची सोय नसली तरी मुंबई आणि नाशिक दोन्ही ठिकाणाहुन एका दिवसात सहज जावून परत येता येते. तसेच मध्य-रेल्वेच्या कसारा स्थानकावर उतरून जीप, रिक्षा किंवा एस.टी.ने या धबधब्यावर सहजच जाता येऊ शकते .

Ashoka Waterfall
Ashoka Waterfall Team Lokshahi

खाण्यासाठी काय मिळणार

जेवण्यासाठी हॉटेल्स वगैरेची सोय नाही मात्र विहिगावमधील काही आदिवासी कुटुंब शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या जेवणाची उत्तम सोय करतात. शिवाय मुंबई नाशिक हायवेलगतच्या हॉटेल्सचाही पर्याय आहे.

Ashoka Waterfall
Ashoka Waterfall Team Lokshahi

या ठिकाणची देखरेख ही वनविभागाकडून केली जाते व वनव्यवस्थापन कमिटीमार्फत पर्यटकांची काळजी घेतली जाते.

Ashoka Waterfall
Ashoka Waterfall Team Lokshahi

जेवणाची ऑर्डर दिल्यास चुलीवरचे शाकाहारी व मांसाहारी जेवणही उपलब्ध केले जाते.. परंतु आता जिल्हाधीकारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. त्यामूळे येथील पर्यटन तुर्त बंद आहे. ते केव्हा सुरु होणार त्याची खात्री करुन प्रवाशाचा बेत तयार करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com