सैफ अली खानला पाहून लोकांना आठवले रामायणातील रावण; त्यांचाच आज स्मृतीदिन

सैफ अली खानला पाहून लोकांना आठवले रामायणातील रावण; त्यांचाच आज स्मृतीदिन

आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील रावण म्हणजेच सैफ अली खानचा लूक खूप ट्रोल होत आहे.
Published on

आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील रावण म्हणजेच सैफ अली खानचा लूक खूप ट्रोल होत आहे.

यावेळी अनेकांना रामानंद सागर यांचा रामायण सिरीअलमधील रावणाचे पात्र आठवत आहे. रामायणमधील रावणाचे पात्र अरविंद त्रिवेदी यांनी साकारले होते. त्यांचाच आज स्मृतीदिन आहे.

अरविंद त्रिवेदी यांनी रावणाचे इतके शक्तिशाली पात्र साकारले की त्याच्या समोरचे इतर सर्व कलाकार अजूनही टीव्हीवर फिकट दिसतात.

त्रिवेदी यांचा अभिनय प्रवास १९७१ मध्ये 'पराया धन' या चित्रपटापासून सुरू झाला.

त्यांनी जवळजवळ ४० वर्षे गुजराती चित्रपटात योगदान दिले. तर, हिंदी आणि गुजराती चित्रपटांसह सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केले होते.

यासह, ते विक्रम आणि वेताळसाठी देखील ओळखला गेले होते.

२००२ मध्ये त्यांना केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी) कार्यवाह अध्यक्षही बनवण्यात आले. १९९१ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदार झाले.

अरविंद त्रिवेदी यांचे ६ ऑक्टोबर २०२१ रोजी निधन झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com