चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला साकडं, पहाटे महाअभिषेक

चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला साकडं, पहाटे महाअभिषेक

चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक करण्यात आला.
Published by :
Team Lokshahi
Published on

चांद्रयान 3 ची चंद्रावर यशस्वी लँडिंग होत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ( इस्रो) ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने मंदिरात पहाटे गणपतीला अभिषेक करत साकडं घालण्यात आले.

याशिवाय गणपती बाप्पांचा मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आले आहे.

चांद्रयान 3 च्या चंद्रावर लॅंडिंगची वेळ आता जवळ आली आहे. चांद्रयान बुधवारी 23 ऑगस्टला संध्याकाळी चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल.

चांद्रयान 2 च्या अयशस्वी प्रयत्नानंतर आता या मोहिमेकडून इस्रोला बऱ्याच अपेक्षा आहेत.

त्यामुळे आता भारत या मोहिमेत यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनेल.

नुकतेच 20 ऑगस्टला, रशियाचे लुना 25 हे अंतराळयान तेथे उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com