भारतीय महिलांनी सातव्यांदा कोरलं आशिया चषकावर नाव
यंदाचा भारतीय पुरुषांना आशिया चषक जिंकता आला नसला तरी भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत आशिया चषकावर आपले नाव कोरलं आहे.
भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरवून सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले आहे.
टी -20 सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
श्रीलंकेकडून ओशादी रणसिंघेनं 13 आणि इनोका रणवीरानं नाबाद 18 धावांची खेळी केली.
तर, आशिया चषक 2022च्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली.
भारतीय गोलंदाज रेणुका सिंहच्या उत्कृष्ट गोलंदाजीने तीन विकेट्स घेतल्या. तसेच राजेश्वरी गायकवाड आणि स्नेहा राणा यांच्या गोलंदाजीनीही दोन विकेट्स घेतल्या.
तसेच श्रीलंकेकडून इनोका रनावीरा आणि कविशा दिल्हारी यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स घेण्यात यश मिळाले.
अंतिम सामन्यात श्रीलंकेनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाने 25 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकीय खेळी केली.
व भारतीय संघाने 8 विकेट्स राखून हा सामना आपल्या खिशात घातला.