Helmet
Helmet Team Lokshahi

Mumbai : हेल्मेट सक्तीची कारवाई धडाक्यात, 6 हजार जणांवर दंड

हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईसाठी सुमारे ५० वाहतूक पोलिस चौक्या सतर्क राहतील.
Published by :
Team Lokshahi
Published on
Helmet
Helmet Team Lokshahi

मुंबई वाहतूक पोलिसांनी गुरुवार, ९ जूनपासून शहरात हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

Helmet
Helmet Team Lokshahi

चालकासह दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीच्या (Helmet compulsory) आदेशाचा पाठपुरावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Helmet
Meta-Virtual Influencer : अभियंता हिमांशूने तयार केलेला कायरा रोबो
Rajtilk Roshan
Rajtilk Roshan Team Lokshahi

पोलिस उपायुक्त (वाहतूक) राजतिलक रोशन (Rajtilk Roshan) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्यासाठी सुमारे ५० वाहतूक पोलिस चौक्या सतर्क राहतील.

Traffic Polices
Traffic PolicesTeam Lokshahi

ज्या दुचाकीस्वारांना परडण्यात येईल त्यांचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, तसेच त्यांना ५०० रुपये दंड भरावा लागेल.

Helmet
दोन सिझननंतर तिसरा सिझन ठरणार का ब्लॉकबस्टर?
Traffic Polices
Traffic PolicesTeam Lokshahi

दरम्यान, कालपासून मुंबई वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

Helmet
Helmet Team Lokshahi

काल पहिल्याच दिवशी ६२७१ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटर पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

Helmet compulsory
Helmet compulsory Team Lokshahi

यामध्ये २३३४ दुचाकी चालक, ३४२१ पिलियन रायडर्स, ५१६ दोन्ही दुचाकीस्वार (Bike Riders) असे मिळून एकूण ६२७१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

@MTPHereToHelp
@MTPHereToHelpTeam Lokshahi

या अधिसूचनेत म्हटले आहे की, हेल्मेटशिवाय वाहन चालवताना आढळल्यास ५०० रुपये दंड भरावा लागेल किंवा ३ महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्यात येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com