अनुपमाबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?
रुपाली गांगुली सध्या छोट्या पडद्यावर राज करत आहे. अनुपमा या सिरिअलमुळे ती घराघरात जाऊन पोहोचली आहे. तिच्या दमदार अॅक्टींगमुळे तिचा मोठा फॅन फॉलोईंग आहे.
रुपाली गांगुली हिचे वडीलही अनिल गांगुली डायरेक्टर आणि स्क्रीन रायटर होते. तर, भाऊ सौरव गांगुली अभिनेता आणि प्रोड्युसर आहे.
अभिनयाची पार्श्वभूमी असल्याने रुपालीने वयाच्या सातव्या वर्षीच मनोरंजन नगरीत पाऊल ठेवले होते.
छोटे कलाकार म्हणून रुपालीने आपल्या वडीलांचा चित्रपट 'साहेब'मध्ये काम केले होते. 1986 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता.
परंतु, सारभाई वर्सेस साराभाई या सिरीअलमधील मोनिशा पात्राने तिला एक वेगळी ओळख मिळाली. याचे श्रेय रुपाली सुमीत राघवानला देते.
रुपालीला बॉडी इमेजमुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. प्रसूतीनंतर तिचे वजन वाढल्यानंतर तिला खूप टीकेला सामोरे जावे लागले होते.
यानंतर, अनुपमा सिरीअलमुळे ती यशाच्या शिखरावर पोहोचली. अनुपमा आणि मोनिशा या दोन्हीही भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली हिने टेलीव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.