खुल जा सिम सिम : अर्पिताच्या घरातील टॉयलेटमध्ये कोट्यावधींची रोकड, दागिने, सोन्याचा विटा
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात ममता यांचे मंत्री पार्थ यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्या दुसऱ्या घरातून आता पुन्हा 27.9 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. यासोबतच 5 किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेलघारियातील दुसऱ्या फ्लॅटवर छापे टाकले. यात खजानाच उघडला आहे.
अर्पिता मुखर्जीने ईडीच्या चौकशीत तिच्या इतर काही मालमत्तांचा उल्लेख केला होता. यातील एक फ्लॅट कोलकात्याच्या बेलघारिया येथेही होता. ईडीने या फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यानंतर अर्पिताच्या घरातील टॉयलेटमध्ये काय आढळले हे पाहून ईडीचे अधिकारीही हैराण झाले. अर्पिताच्या घरातून ईडीला 27.9 कोटी रुपये सापडले आहेत. त्यात 2000 आणि 5000 रुपयांच्या नोटांचे बंडल होते. या नोटा 20-20 लाख आणि 50-50 लाखांच्या बंडलमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्पिता धन कन्या...
ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांचे नाव गेल्या आठवडाभरापासून देशभर चर्चेचा विषय आहे. कोणी अर्पिताला धन कन्या म्हणत आहेत, तर कोणी तिला कॅश क्वीन म्हणत आहेत. काहीही झाले तरी ईडीच्या छाप्यांमध्ये तिच्या घरात नोटांचे बंडल ज्या प्रकारे सापडत आहेत ते पाहून हे नाव अर्पिताला देणे अत्यावश्यक आहे. ईडीने आतापर्यंत अर्पिता मुखर्जीच्या घरातून 50 कोटी रुपये जप्त केले आहेत.
पहिल्या दिवशीच्या छाप्यात काय सापडले? ईडीने 23 जुलै रोजी अर्पिताच्या फ्लॅटवर छापा टाकला होता. यादरम्यान ईडीकडे सुमारे 21 कोटी रुपये रोख मिळाले होते. एवढेच नाही तर ईडीने अर्पिताच्या घरातून 20 मोबाईल आणि 50 लाख रुपये किमतीचे दागिनेही जप्त केले आहेत. अर्पिताच्या घरातून ईडीला सुमारे 60 लाखांचे विदेशी चलनही मिळाले होते. यानंतर ईडीने अर्पिता मुखर्जीला अटक केली.
पहिल्या दिवशीच्या छाप्यात काय सापडले? ईडीने 23 जुलै रोजी अर्पिताच्या फ्लॅटवर छापा टाकला होता. यादरम्यान ईडीकडे सुमारे 21 कोटी रुपये रोख मिळाले होते. एवढेच नाही तर ईडीने अर्पिताच्या घरातून 20 मोबाईल आणि 50 लाख रुपये किमतीचे दागिनेही जप्त केले आहेत. अर्पिताच्या घरातून ईडीला सुमारे 60 लाखांचे विदेशी चलनही मिळाले होते. यानंतर ईडीने अर्पिता मुखर्जीला अटक केली.
सोन्याचा विटा आणि बरेच काही...
बुधवारी ईडीला अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या फ्लॅटमधूनही मोठ्या प्रमाणात सोने मिळाले. छापेमारीत 4.31 कोटी रुपयांचे सोने सापडल्याचे ईडीने सांगितले. यामध्ये प्रत्येकी 1 किलोच्या 3 सोन्याच्या विटा, अर्धा किलोच्या 6 सोन्याच्या बांगड्या आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर या अड्ड्यावर सोन्याचे तवाही सापडले आहेत.
कशी जाळ्यात आली आर्पिता
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या घरावर ईडीने नुकतेच छापे टाकले होते. दरम्यान, ईडीला पार्थ चॅटर्जीच्या घरातून काही स्लिप मिळाल्या होत्या. यामध्ये वन सीआर अर्पिता, फॉर सीआर अर्पिता असे लिहिले होते. यावरूनच ईडीला अर्पिता मुखर्जीकडे रोख रक्कम ठेवल्याची कल्पना आली. यानंतर ईडीने अर्पिता मुखर्जीच्या ठिकाणावर छापा टाकून रोख रक्कम जप्त केली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलै रोजी केलेल्या कारवाईदरम्यान एजन्सीला अर्पिताच्या घरातून एक काळी डायरीही सापडली होती.
तीन डायऱ्यात कोडवर्ल्ड
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 तास चाललेल्या छाप्यात अर्पिताच्या फ्लॅटमधून 3 डायरीही सापडल्या आहेत, ज्यामध्ये कोडवर्डमध्ये व्यवहाराची नोंद आहे. तपास यंत्रणेने घरातून 2,600 पानांचे कागदपत्रही जप्त केले आहे, ज्यामध्ये पार्थ आणि अर्पिताच्या संयुक्त मालमत्तेचा उल्लेख आहे. ईडीने बुधवारीच पार्थ आणि अर्पिताच्या जवळच्या मित्रांच्या घरावर छापे टाकले. याशिवाय ईडीचे पथक उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बेलघरिया आणि राजदंगा येथेही तपासासाठी पोहोचले होते. अर्पिताचे घर जेथून रोख रक्कम सापडली ते बेलघरिया येथे आहे.