जगातील सर्वात वेगवान धावपट्ट म्हणून ओळख असणारा उसैन बोल्ट वयाच्या 31 व्या वर्षी निवृत्त झाला. अगदी क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीने 39 व्या वर्षी निवृत्ती घेतली. परंतु एखाद्या गोष्टीचे ध्येय घेतले तर वयाचे बंधन आडवे येत नाही.
मग ते कोणतेही क्षेत्र असो. अगदी क्रीडा क्षेत्रातही नातवांशी खेळण्याच्या वयात गोल्ड मेडेल मिळवता येते. एका 94 वर्षीय महिलने भारतासाठी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये तीन पदके मिळवून दिली. पाहा, लोकशाही मराठीचा हा विशेष रिपोर्ट
वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत 35 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे खेळाडू सहभागी होतात. या वर्षी फिनलँड येथे झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये 94 वर्षांच्या भगवानी देवी डागर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे.
यापूर्वी चॅम्पियनशिपमध्ये ही 100 मीटर शर्यत 23.15 सेकंदात पूर्ण करण्याचा विश्वविक्रम आहे. भारताच्या आजीने ते 24.74 सेकंदात पूर्ण केले आहे. हा विश्वविक्रम मोडण्यात अवघ्या 1 सेकंदाने मागे पडली.
यापूर्वी चॅम्पियनशिपमध्ये ही 100 मीटर शर्यत 23.15 सेकंदात पूर्ण करण्याचा विश्वविक्रम आहे. भारताच्या आजीने ते 24.74 सेकंदात पूर्ण केले आहे. हा विश्वविक्रम मोडण्यात अवघ्या 1 सेकंदाने मागे पडली.
रोज सकाळी 5 वाजता उठून त्या नियमित धावण्याचा सराव करतात. संध्याकाळी त्याचा हा उपक्रम सुरु असतो.
भगवानी देवीच्या यशानंतर सोशल मीडियावर त्यांच्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रीडा मंत्रालयाने टि्वट करत म्हटले की, भारताच्या 94 वर्षीय भगवानी देवी यांनी पुन्हा सिद्ध केले आहे की वय हा अडथळा नाही. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही देवीचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
दिल्ली विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. भारताच्या या आजीबाई देशातील तमाम खेळाडूंसाठीच नाही तर वयोवुद्ध व्यक्तीसाठी आदर्श ठरल्या आहेत.