Yugendra Pawar : Baramati Vidhansabha : बारामतीत आज मतदान कोण मारणार बाजी? कोण ठरणार "दादा"?

Yugendra Pawar : Baramati Vidhansabha : बारामतीत आज मतदान कोण मारणार बाजी? कोण ठरणार "दादा"?

बारामती विधानसभा निवडणूक: अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार. कोण मारणार बाजी? संपूर्ण राज्याचं लक्ष या हाय व्होल्टेज लढतीकडे.
Published by :
shweta walge
Published on

आज विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी मतदान पार पडत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार असा हाय व्होल्टेज सामना रंगत असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यातच शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी बारामतीची जनता पवार साहेबांना विसरणार नाहीत, आम्हाला ते आर्शिवाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ते म्हणाले की, भरपूर महिन्यांपासून सर्वांनी खूप कष्ट घेतले होते. सगळे खूप फिरले. आणि आम्हाला विश्वास आहे की बारामतीची जनत पवार साहेबांना विसरणार नाहीत, आणि आम्हाला ते आर्शिवाद देतील हा विश्वास आहे.

माजी आयपीएस अधिकारी रवींद्र नाथ पाटील यांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (दोन्ही एमव्हीए भागीदार) क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सामील असल्याचा गंभीर आरोप केला आहेत. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ते आरोप खोटे आहेत, चुकीचे आहेत. आमचा पक्ष आणि सुप्रिया ताई स्वत त्याला प्रतिक्रिया देणार आहेत.

भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून काही व्हिडीओही शेअर करण्यात आले यावर युगेंद्र पवार म्हणाले की, निवडणुकीच्या आधी कोणीही कीतीही कुठल्याही पातळीवर जाऊ शकत. हे आपण बघीतलं. अनेक गावांमध्ये, अनेक शहरांमध्ये अनेक गोष्टी घडल्या आहेत त्यामुळे हे होत असत.

सगळेच व्हिडीओ खरे असतात अस नाही आहे. जेव्हा बारामतीत लोकसभा निवडणुक होती तेव्हा पण भरपूर व्हिडीओ समोर आलेले. आणि आजपण नवेनवे व्हिडीओ समोर आले आच्छर्य वाटायला नको.

युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या बारामतीमधील शरयू मोटर्समध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आले होते यावर ते म्हणाले, खरतर तिथे काय नव्हतच. तिथे काही सापण्यासारख नाहीच आहे. आणि आम्ही काही चुकीच कधी केलं नाही करतही नाही कायदा पाळणारी लोक आम्ही आहोत. आणि योगायोग म्हणा कींवा काही म्हणा अस आम्हच्यावर सर्च ऑपरेशन केलं गेल ठीक आहे आम्ही सहकार्य करु.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com