विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार; संजय राऊत म्हणाले...

विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार; संजय राऊत म्हणाले...

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. एका जातीवर निवडणून येणं शक्य नाही. हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. मराठा समाज बांधवांनी आपापले अर्ज मागे घ्यावेत.असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष जो आहे. जो सातत्याने महाराष्ट्रात सुरु आहे. हा संघर्ष त्यांच्या समाजाचा विकासासाठी, उद्धारासाठी आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. हे मान्य केलं पाहिजे. समाज त्यांच्या पाठिशी उभा आहे हेसुद्धा मान्य केलं पाहिजे. समाज एकसंघपणे उभा आहे हेसुद्धा मान्य केलं पाहिजे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही स्वत: त्यांचा जो लढा आहे हा राजकीय मानत नाही. हा सामाजिक लढा आहे. ही एक सामाजिक चळवळ आहे. नक्कीच त्यांच्या लढ्याला आमच्या कायम शुभेच्छा आणि पाठबळ राहिल. असे संजय राऊत म्हणाले.

विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार; संजय राऊत म्हणाले...
Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com