Will Sameer Bhujbal withdraw
Will Sameer Bhujbal withdraw

पंकज भुजबळ यांची आमदार म्हणून नियुक्तीनंतर समीर भुजबळ माघार घेतील का?

राज्यपाल नियुक्त आमदार यादीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांचा सुद्धा समावेश आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर झाली. तत्पूर्वी महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 पैकी 7 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे तीन, तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या प्रत्येकी दोन नावांचा समावेश आहे. राज्यपालांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित असताना राजकीय नेत्यांचीच वर्णी लावली जात असल्याचे बोललं जात आहे.

राज्यपाल नियुक्त आमदार यादीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांचा सुद्धा समावेश आहे. ते नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राहिले आहेत. मात्र गेल्या वर्षी सुहास कांदे यांनी त्यांचा पराभव केला होता. तेव्हा कांदे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असताना तेथे मात्र महायुतीकडून छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील निवडणूक लढविण्याचे संकेत दिले असून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे कडून तिकिटांची मागणी ते करीत आहेत.

त्यामुळे आता पंकज भुजबळ यांना आमदार पदी बसवल्यानंतर आता समीर भुजबळ माघार घेतील का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. या प्रश्नावर नाशिकचे पालकमंत्री यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. दरम्यान, नांदगाव विधानसभा मतदारसंघात स्टँडिंग आमदार शिवसेनेचा आहे त्यामुळे ती जागा शिवसेनेचीच राहणार असल्याचा दावा मंत्री दादा भुसे यांनी केला आहे.

कोण आहेत पंकज भुजबळ?

पंकज भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे संचालक आणि मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव आहेत. नांदगाव तसा दुष्काळी भाग आणि मतदार संघ. या ठिकाणाहून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दोनवेळा विधानसभेवर गेले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com