मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
थोडक्यात
मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम
महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार?
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीने 46 जागांवर विजय मिळवला. यामध्ये महायुतीत भाजपला 132 जागा, शिवसेना शिंदे गटाला 57 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 16 जागा, ठाकरे गटाला 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यातच राज्यभरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ समर्थकांकडून अनोख्या पध्दतीने आंदोलने करण्यात आली.
यातच काल एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यातच आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.