विधानसभा निवडणूक 2024
विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात वेगवेगळ्या शहरात 80 ठिकाणी संमेलन मेळावे घेण्यात येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका टाळण्यासाठी हिंदू मत विभाजित होणार नाही यासाठी विश्व हिंदू परिषदचा पुढाकार पाहायला मिळत आहे. कुठल्याही राजकीय पक्षांचा झेंडा न घेता 100 टक्के मतदानाचे विहिप आवाहन करणार असल्याची माहिती मिळत आहे.