विधानसभा निवडणूक 2024
Vidhansabha Exit Poll 2024: किंगमेकर अजितदादा होणार?; काय म्हणले गणेश खणकर...
अजित पवारांच्या वेगळ्या प्रचारामुळे ते किंगमेकर ठरतील का? गणेश खणकरांचा अंदाज वाचा आणि जाणून घ्या महायुतीच्या सत्ता स्थापनेबद्दल.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार या सगळ्यामध्ये एका गोष्टीकडे लक्ष गेल की अजित पवारांनी केलेलं यावेळीचा प्रचार हा काहीसा वेगळा होता. त्यांनी बटेंगे तो कटेंगे हा भाजपचा मुद्दा ज्याप्रकारे लोकांसमोर मांडला की महाराष्ट्रात हे लागू होणार नाही आणि त्यानंतर जाती आणि वंचितांच्या आधाररे निवडणूक लढवली जात नाही हे जे मुद्दे अजित पवारांनी मांडले त्यामुळे ते या निवडणुकीत किंगमेकर ठरु शकतात असं म्हटलं जात आहे.
मग यावर गणेश खणकर म्हणाले की, सत्ता कोणाची येणार तर ते मी तुम्हाला सांगू शकतो, की २३ तारखेला महायुती राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्यासाठी गेलेली असले. मग त्यातून कोण खरा किंगमेकर होईल हे तुम्हाला कळेलच.