Vidarbha Election Poll |आता लक्ष निकालाकडे...विदर्भाचा कौल कुणाला? Devendra Fadnavis गड राखणार का?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार हे पाहण महत्वाच ठरणार आहे. दरम्यान विदर्भात एकूण 62 मतदारसंघ आहेत. या 62 जागांपासून काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. विदर्भात कोणाच्या बाजूने कौल मिळते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विदर्भातील तब्बल 41 मतदार संघात 2019 च्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे विदर्भातील मतदानाचा वाढलेला टक्का नेमका कोणाला फायदेशीर ठरेल अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये विदर्भातील 62 पैकी 50 मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली होती.
राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा रिंगणात असून त्यांच्याविरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे पाटील मैदानात आहेत.