दिंडोरी विधानसभेत महायुतीत बंडखोरीची शक्यता; शिवसेनेचे धनराज महाले निवडणूक लढण्यावर ठाम

दिंडोरी विधानसभेत महायुतीत बंडखोरीची शक्यता; शिवसेनेचे धनराज महाले निवडणूक लढण्यावर ठाम

दिंडोरी विधानसभेत महायुतीत बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिंडोरी विधानसभेत महायुतीत बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेचे धनराज महाले निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. धनराज महाले 24 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता यावर प्रतिक्रिया देताना धनराज महाले म्हणाले की, निवडणुकीची तयारी गेल्या दोन वर्षापासून केली. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने त्याठिकाणी काम पण केलं. महायुतीचं जे काही शासनाचे निर्णय झालेत ते लोकांपर्यंत पोहचवले आणि उमेदवारी करण्याच्या इच्छेनं म्हणून आतापर्यंत काम केलं आहे. एबी फॉर्म जरी दिला असेल येणाऱ्या 24 तारखेला अपक्ष म्हणून त्याठिकाणी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. चर्चेविना एबी फॉर्म दिले गेले.

यासोबतच ते म्हणाले की, जर महायुती आपण म्हणतो तर सर्वांना एकत्रित बसवून जे काही इच्छुक असतील, जे काम करणारे असतील. त्यांना सर्वांना एकत्र बसवून निर्णय घ्यायला पाहिजे. परंतु तसा निर्णय झाला नाही. त्याच्यामुळे जननेतून मी निवडणूक करणार आहे. उमेदवार समोर कोण आहे ते काय मी बघणार नाही. मला निवडून यायचं आहे. समोर उमेदवार कोणी असला तरी त्याठिकाणी मला निवडणुकीला सामोरे जायचं आहे. असे धनराज महाले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com