केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता
थोडक्यात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या मुंबईत होणार पत्रकार परिषद
भाजपचा विधानसभेचा जाहीरनामा शाह यांच्या हस्ते प्रकाशित होण्याची शक्यता
भाजपचा जाहीरनामा नेमका कसा असणार? याकडे सर्वांचं लक्ष
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेमधून भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपचा विधानसभेचा जाहीरनामा अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशित होण्याची शक्यता असून भाजपचा जाहीरनामा नेमका कसा असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या जाहीरनाम्याच काय घोषणा होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.