Uddhav Thackeray Sangola: सांगोल्या उद्धव ठाकरे कडाडले, ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?
सांगोल्यात भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी गुवाहाटीला गेलेल्या उमेदवारांची टिंगल उडवली आहे. यावेळी ते म्हणाले कोणाकडे रेल्वेचं तिकट आहे का? 23 तारखेचं गुवाहाटीच तिकिट हवं असं म्हणत त्यांनी विरोधकांना निशाण्यावर घेत भाषणाला सुरुवात केली. पुढे ते म्हणाले, मागच्या वेळेस एका गद्दाराला आपण संधी दिली आणि त्यानी फक्त संधीच नाही तर आयुष्याचं मातेरं केलं. मोदी आणि शाहांवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी आणि शाहा आता फिरत आहेत. अमित शाहांवर तर काय बोलण्यासारखचं नाही. लगे रहो मुन्ना भाईच्या सर्किट सारखे फिरत आहेत आता ते.
आम्ही 370 कलम काढले मग शेत मालाला भाव का मिळत नाही अमित शहा म्हणत होते उद्धव ठाकरेंनी 370 कलम हटवण्यास परवाणगी दिली नव्हती पण 370 कलम काढण्यामागे शिवसेनाच तुमच्या पाठी होती अमित शहा यांना स्मृती भरंश झाला आहे. जेव्हा काश्मीरमध्ये हिंदू पांडीतानावर अन्याय होत होते त्यावेळी मोदी शहा कुठच नव्हते त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आधार दिला होता.
370 कलम काढल्यानंतर किती काश्मीरी हिंदू पांडीतांना तुम्ही आसरा दिला. आज महाराष्ट्रातील जनता रोजगार मागत आहे तुम्ही सांगता 370 कलम काढले, शेतकरी हमीभाव मागत आहे तुम्ही सांगता राम मंदिर बांधल. ज्यावेळी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणी ओळखत नव्हतं त्यावेळेस पासून आम्ही खांद्यावर घेऊन फिरलो आणि त्यामुळेच हे आता आमच्या डोक्यावर बसले आहेत हे. पण आम्हाला खांद्यावर घेताही येत आणि खांदा देता ही येतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.