Uddhav Thackarey: अडीच वर्ष झाली, न्याय मागतोय; प्रचार संपण्याआधी उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद

Uddhav Thackarey: अडीच वर्ष झाली, न्याय मागतोय; प्रचार संपण्याआधी उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद

प्रचार संपण्याआधी उद्धव ठाकरेंनी जनतेसोबत संवाद साधला आहे. अडीच वर्ष झाली, न्याय मागतोय आपल सरकार सुरळीत असूनही ते पाडण्यात आलं.
Published by :
Team Lokshahi
Published on

सध्या राजकीय वर्तूळात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहे. लोकसभेला जे चित्र राजकीयवर्तूळात पाहायला मिळत होत तेच चित्र आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदलेलं दिसत आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार अशी घोषणा केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षातील नेते आपल्या सभा आणि पत्रकार परिषद घेत आहेत आणि यादरम्यान नेते विरोधकांवर अनेक टीका टिपण्णी करत करत त्यांच्यावर आरोप करत आहेत. तर यात अनेक आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. याचपार्श्वभूमीवर प्रचार संपण्याआधी उद्धव ठाकरेंनी जनतेसोबत संवाद साधला आहे. अडीच वर्ष झाली, न्याय मागतोय आपल सरकार सुरळीत असूनही ते पाडण्यात आलं. आता जनतेच्या दरबारात उतरलो आहे अशाप्रकारची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

आज मी आपल्याकडे न्याय मागायला आलेलो आहे- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले की, "आज मी आपल्याकडे न्याय मागायला आलेलो आहे. लोकशाही टिकवण्यासाठी मला तुमची सोबत पाहिजे. या लढाईमध्ये केवळ माझ्या अस्तित्त्वाचा प्रश्न नाही आहे... तर महाराष्ट्राच्या अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला लुटायचं काम सुरु आहे, महाराष्ट्राला गुलाम बनवण्याचं काम सुरु आहे आपण ते डोळ्यादेखत होऊन द्यायचं? मला तरी नाही पटत हे, आणि म्हणून सगळ्यांनी सहकुटुंब उतरा आपल्या कुटुंबात जेवढे मतदार आहेत त्यासर्वांनी उतरा आणि जिथे जिथे आपले उमेदवार उभे आहेत त्यांना भरगोस मत द्या. मग निशाणी कोणती बरोबर आहे... मशाल...बाळासाहेबांची मशाल आणि तुम्ही स्वतः बाळासाहेबांची मशाल आहात असं समजा आणि उतरा आणि या गुलुमशाहीला जाळून भस्म करा. "

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com