independant candidate beaten by vanchit
independant candidate beaten by vanchit

वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवाराला काळं फासलं

बीडमध्ये अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना काळ फासून मारहाण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाजप उमेदवाराला पाठिंबा का दिला म्हणून वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवाराला आधी काळे फासलं त्यानंतर चक्क चाबुकाने फटके दिले.
Published by :
Team Lokshahi
Published on

बीडमधील अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना काळ फासून मारहाण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार केला आहे. या उमेदवारानं भाजपला पाठिंबा दिल्यानं वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. याचा निषेध म्हणून आपण हे कृत्य केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात

  • वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवाराला काळं फासलं

  • उमेदवाराने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

  • व्हिडीओ काढून माफी देखील मागायला लावली

  • बीडच्या अंबाजोगाई शहरातील प्रकार

नेमकं काय घडलं?

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा नामांकन अर्ज अवैध ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना पाठिंबा दर्शवला होता. मात्र, सचिन चव्हाण अपक्ष उमेदवाराने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने वंचितचे पदाधिकारी आक्रमक झाले.

भाजप उमेदवाराला पाठिंबा का दिला म्हणून वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवाराला आधी काळे फासलं त्यानंतर चक्क चाबुकाने फटके दिले. एवढेच नाही तर त्याचा व्हिडिओ काढून माफी देखील मागायला लावली. घटना बीडच्या केज राखीव मतदारसंघ अंबाजोगाई शहरातील आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप पोलिसात कसल्याच गुन्ह्याची नोंद झाली नाही.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा:

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com