Sushma Andhare on Kalyan crime rate
Sushma Andhare on Kalyan crime rateAdmin

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम रेट कल्याणचा: सुषमा अंधारे

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम रेट कल्याणचा असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. 'वाढत्या क्राईम रेटला सत्ताधारी आमदार जबाबदार असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम रेट कल्याणचा- सुषमा अंधारे

  • 'वाढत्या क्राईम रेटला सत्ताधारी आमदार जबाबदार'

  • ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप

कल्याण पश्चिम मतदारसंघात सचिन बासरे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम रेट कल्याणचा असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. 'वाढत्या क्राईम रेटला सत्ताधारी आमदार जबाबदार असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

"महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त क्राईम रेट हा कल्याणचा आहे. इथे दहशतीचे वातावरण आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सत्ताधारी आमदारांनी एकच काम केले. आपल्या मर्जीतील पोलिस निरिक्षक आणून बसविले. जो कोणी सत्ताधारी आमदारांवर बोट ठेवतो, लगेच त्याच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करायचे. त्यामुळे इथला क्राईम रेट वाढत गेला. पोलिस ठाण्यात गोळीबार होतो तर पोलिसांचा धाक काय? अशी सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. अंधारे या कल्याण पश्चिमेत ठाकर गटाचे उमेदवार सचिन बासरे यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी ही टीका केली आहे.

सोयाबीनचे भाव घसरले: सुषमा अंधारे

देवेंद्र फडणवीस यांनी पाशा पटेल यांच्यासोबत कृषी दिंडी काढली होती. कृषी दिंडी काढत त्यांनी सांगितले की, सोयाबीनला सहा हजार भाव देऊ, आत्ता फडणवीसांचे सरकार होते, तेव्हा सोयाबीनचा भाव 3800 ते 3500 पर्यंत खाली घरसला आहे. सरकार असताना तुमचे पंचाग हरविले आहे का असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. का बरं सोयाबीन आणि कापसाला भाव दिला नाही, उद्धव ठाकरे यांचे सरकार असतांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला. सोयाबीनला सहा हजार आणि कापसाला 12 हजार रुपयांपर्यत गेला, जे फडणवीस आत्ता घोषणांचा पाऊस पाडत आहे. त्यांना साधा प्रश्न विचारायचा आहे. एक रुपयाच्या विम्याचे चॉकलेट दाखविले होते, ते काय झाले. विमा कंपन्यांचा फायदा फडणवीसांनी केला. विमा कंपन्यांचा फायदा करुन देत असताना शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले? ज्या मुस्लिमांबद्दल काय भूमिका आहे. हे अवघा महाराष्ट जाणतो. मुस्लीमांशी शत्रूभावाने जे लोक वागतात, अशा लोकांना कल्याण पश्चिमेतून मुस्लीमांची मते हवी आहेत. आत्ता त्यांना साबीर भाईंची आठवण येत आहे. हे मुस्लीम समाज ओळखून आहे असा टोला शिंदे गटाला लगावला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com