Sushma Andhare On Amit Shah: अमित शाह एवढं खोटं कसं बोलतात?; सुष्मा अंधारेंचा शाह यांच्यावर हल्ला
थोडक्यात
सुषमा अंधारे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर हल्लाबोल केला आहे.
अमित शहा तुम्ही एवढ खोट कस बोलता.
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आता भाजप मध्ये आहेत
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर हल्लाबोल केला आहे. अमित शाह एवढं खोटं कसं बोलतात? एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते?, असा संतप्त सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
70 हजारांचा घोटाळा ज्यांनी केला त्यांना आम्ही चक्की पिसायला पाठवतो असं तुम्हीच जाहिर सभेत म्हणाले होतात, आणि आता त्याच लोकांना तुम्ही सत्तेत घेऊन बसलात? किरिट सोमय्या यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आता भाजप मध्ये आहेत, असं टीकास्त्र सुषमा अंधारेंनी डागळलं आहे.
यासोबत त्या म्हणाल्या, ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता ते सगळे आज भाजपमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच अमित शाहा महाराष्ट्रात आल्यावर ज्याप्रकारे त्यांच्या भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट उद्धव ठाकरे यांच्या नावाने करतात त्यावरुन त्यांना महाराष्ट्रातल सर्वात मोठ आणि भक्कम आवाहन हे उद्धव ठाकरे वाटतात याचा आम्हाला आनंद आहे.