Sudhir Mungantiwar On MVA: 'मविआला चांगल्या शिक्षकाची गरज' सुधीर मुनगंटीवारांचा मविआवर हल्लाबोल
थोडक्यात
मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा महाविकास आघाडीवर टोला
सुधीर मुनगंटीवारांचा महाविकास आघाडीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
त्यांची जी राजकीय पचनक्रिया आहे त्यावरुन त्यांना अल्झायमर झाल्या सारख ते वागत आहेत.
मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मविआवर टोला केला आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, महाविकास आघाडीला अल्झायमर झाला असून त्यांना चांगल्या शिक्षकाची गरज आहे. ज्या गोष्टी त्यांच्या कार्यकक्षेत नाही, त्या घोषणा मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीरनाम्यात केल्याची टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
आम्ही लाडकी बहिण योजना काढली कोणी विरोध केला. आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये टाकले नंतर आम्ही 12 हजार रुपये टाकले आणि आता आम्ही 16 हजार रुपये टाकणार आहोत. लाडक्या बहिणीला जेवढा विरोध सावत्र भावाने नाही केला तेवढा विरोध तर कॉंग्रेसने केला. मला असं वाटत की कॉंग्रेसला आता निवडणूकी दरम्यान खोट बोलण्याचा अधिकारच राहिला नाही.
ज्याप्रकारे खोट बोलतात त्यावरून मला असं वाटतं की, पहिला चाची 420 चित्रपट निघाला, आता मला असं वाटत की सी फॉर कॉंग्रेस असा चित्रपट काढायचा. आम्ही 1500 दिले आता त्याचे 2100 केले आता ते कॉपी करत आहेत आता ते म्हणत आहेत की आम्ही पैसे देऊ. शेतकऱ्यांना पैसे दिले तर ते पचत नाही. बटेंगे तो टिकेंगे केल तर ते पण पचत नाही. त्यांची जी राजकीय पचनक्रिया आहे त्यावरुन त्यांना अल्झायमर झाल्या सारख ते वागत आहेत.