कर्जत-खालापूर मतदारसंघात महायुतीला धक्का; राष्ट्रवादीचे सुधाकर घारे शेकडो कार्यकर्त्यांसह महायुतीतून बाहेर

कर्जत-खालापूर मतदारसंघात महायुतीला धक्का; राष्ट्रवादीचे सुधाकर घारे शेकडो कार्यकर्त्यांसह महायुतीतून बाहेर

कर्जत-खालापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत-खालापूर मतदारसंघात रोज नव्या घडामोडी घडत आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

कर्जत-खालापूर मतदारसंघात महायुतीला धक्का; राष्ट्रवादीचे सुधाकर घारे शेकडो कार्यकर्त्यांसह महायुतीतून बाहेर.

कर्जत-खालापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत-खालापूर मतदारसंघात रोज नव्या घडामोडी घडत आहेत. सुधाकर घारे यांनी कर्जत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे मागणी केली होती मात्र स्थानिक आमदार शिंदेंच्या शिवसेनेचे असल्यामुळे ही जागा शिंदे गटाकडे गेली. शिंदे गटाकडून आमदार महेंद्र थोरवेंना उमेदवारी मिळाल्याने घारेंमध्ये नाराजी पाहायला मिळाली. यांच कारणामुळे कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि प्रदेश कार्यालयाचे सरचिटणीस यांनी सर्व कार्यकर्त्यांसह सामूहिक राजीनामे पक्षाकडे दिलेले आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. सुधाकर घारे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे. तर ते 25 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com