Shreejaya Chavan|अशोक चव्हाण यांच्या मुलीला भाजपने दिली उमेदवारी
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 13 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अशोक चव्हाण यांच्या मुलीला भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांना भाजपाने राज्यसभेवर घेतलं होतं. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघामधून भाजपाने उमेदवारी दिली आहे. श्रीजया चव्हाण या माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. त्या पेशाने वकील आहेत. तसंच भाजपाने तिकिट देण्याआधी भाजपा युवा मोर्चाचं काम करत आहेत.
भाजयुमोने विकसित महाराष्ट्रासाठी आयडिया हा कार्यक्रम त्यांनी सुरु केला आहे. मुदखेड या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. भारत जोडो अभियानाच्या राहुल गांधी यांच्या स्वागताच्या प्रत्येक बॅनरवर श्रीजयाचा फोटो झळकले होते. तेव्हापासूनच श्रीजया चव्हाण आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याची चर्चा रंगली होती. मागील काही महिन्यांपासून श्रीजया चव्हाण या राजकारणात अधिक सक्रिय झाल्या होत्या. त्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. भोकरमधून कन्या श्रीजया चव्हाण या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार असतील हे लक्षात घेवून चव्हाण यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढला होता. आता भाजपाने त्यांनी भोकरमधून संधी दिली आहे.