Shivsena Vidhansabha Candidate: ठाण्यातील शिवसेनेच्या आमदारांचा पत्ता कट?; कोण आहेत ते आमदार ?
ठाण्यातील शिवसेनेच्या 3 आमदारांचा पत्ता कट होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीसाठी त्यांची नाव आलेली नाहीत. बंडात साथ देणाऱ्या तिघांची नाव पहिल्या यादीत नाहीत. यात आमदार विश्वनाथ भोईर यांच नाव नाही आहे, तसेच शांताराम मोरे आणि बालाजी किणीकर यांना देखील संधी नाही आहे यांची नाव पहिल्या यादीत नसल्याने आता तर्कवितर्क यांना उधाण आलं आहे.
तर शिंदेंनी अडीच वर्षांआधी बंड केलेला होता. ते आधी गुजरातमध्ये सुरतला गेलेले होते. त्याच्यानंतर गुवाहाटी गेले आणि मग गोव्याला गेले आणि अखेरीस मुंबईला येऊन ज्यावेळी मविआचं सरकार कोसळलं उद्धव ठाकरे हे पायउतार झाले त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांच्यासोबत असलेले हे जे तीन आमदार आहेत त्यांचा पत्ता कट झाल्याचं समोर येत आहे.
कारण कालचं शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी समोर आली आहे. त्याच्यामध्ये 45 नावांचा समावेश आहे. तर याच्यात जास्तीत जास्त जे विद्यमान आमदार आहेत त्यांची नाव दिसत आहेत. पण ठाण्यातील शिवसेनेच्या तीन आमदारांची नाव त्या यादीत नाही आहेत त्याच्यामुळे आता या तिघांना संधी दिली जाणार नाही का ? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.