उद्धव ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; 65 शिलेदार मैदानात

उद्धव ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; 65 शिलेदार मैदानात

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
shweta walge
Published on

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कोपरी मतदारसंघातून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चाळीसगावातून माझी खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

२००९ पासून कोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे आमदार आहेत. परंतु, २०२२ मध्ये झालेल्या शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन प्रमुख गट पडले. त्यामुळे एकनाथ शिंदेंविरोधात महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. या जागेवर आता धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, ओवळा माजिवडातून नरेश मणेरा, कोपरी पाचपाखाडी येथून केदार दिघे, ठाण्यातून राजन विचारे, ऐरोलीतू एम. के. मढवी, मागाठाण्यातून उद्देश पाटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com