Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा; करण्यात आल्या 'या' मोठ्या घोषणा

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज वचननामा जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा वचननामा जाहीर करण्यात आल्या. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या.

•संस्कार

प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.

•अन्नसुरक्षा

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर या जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्षे स्थिर ठेवणार.

•महिला

महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार. प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र २४x७ महिला पोलीस ठाणे सुरु करणार. अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.

•आरोग्य

प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.

•शिक्षण

जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार.

•पेन्शन

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार.

•शेतकरी

'विकेल ते पिकेल' धोरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार.

• वंचित समूह

वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार.

•मुंबई

धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार.

मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार.

•उद्योग

बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार, निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com