sharad Pawar
sharad Pawar Team Lokshahi

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. सत्ता गेली की लाडकी बहिण योजना बंद होणार असा प्रचार महायुतीकडून करण्यात आला. त्याचा फटका महायुतीला बसला असल्याचं शरद पवार म्हणाले.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीकडून सोमवारी शपथविधी समारंभ पार पडणार आहे. महायुतीकडून मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. राज्यामध्ये महायुतीला २३० जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला ५० चा आकडाही पार करता आला नाही. महाविकास आघाडीच्या मोठ्या पराभवानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. सत्ता गेली की लाडकी बहिण योजना बंद होणार असा प्रचार महायुतीकडून करण्यात आला. त्याचा फटका महायुतीला बसला असल्याचं शरद पवार म्हणाले. 'बटेंगे तो कटेंगे' या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच अधिकृत माहिती मिळाल्यावरच ईव्हीएमवर बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अपेक्षित असा निकाल लागला नाही. पुन्हा नव्या जोमाने जनतेसमोर जाणार आहोत. आम्हाला अधिक काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लोकसभेनंतर आम्हाला जास्त विश्वास आला होता. मराठा-ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणावर खोलात जाऊन अभ्यास करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

निकालाचा धक्का बसला का असा पत्रकारांनी सवाल विचारला असता शरद पवार म्हणाले की, निकाल काल लागला आज आपण कराड दौऱ्यावर आहोत. जनतेमध्ये पुन्हा नव्या जोमाने जायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला विधानसभा निवडणुकीत अवघ्या १० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडू आलेल्या आमदारांची यादी पुढीलप्रमाणे-

१. मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड

२. वडगाव-शेरी - बापूसाहेब तुकाराम पाठारे

३. कर्जत-जामखेड - रोहित पवार

४. बीड - संदीप क्षीरसागर

५. करमाळा - नारायण(आबा) गोविंदराव पाटील

६. माढा - अभिजीत पाटील

७. मोहोळ - राजू खरे

८. माळशिरस - उत्तमराव जानकर

९. इस्लामपूर - जयंत पाटील

१०. तासगांव- कवठेमहाकांळ - रोहित पाटील

शरद पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com