Sharad Pawar Baramati: मविआने घटना दुरूस्ताचा डावा हाणून पाडला
बारामतीमध्ये आज पवारांकडून सांगता सभा घेण्यात आल्या बारामती म्हटलं की शरद पवार हे नाव गाजलेलच असत. यावेळी बारामतीची दोरी यावेळी शरद पवारांचा बारामतीतला वारसा युगेंद्र पवार सांभाळणार असल्याचं विधानसभा निवडणूकीत पाहायला मिळत आहे. त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा असं आव्हान शरद पवारांनी बारामतीकरांना केलं. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली.
बहिणींना लाडकी बहिण योजना दिली पण बहिणींच्या रक्षणाच काय?- शरद पवार
यावेळी शरद पवार म्हणाले की, आज आज शेवटची जाहीर सभा होते आहे. 6 वाजता सभा संपायला हवी. लोकसभेचा निकाल हा देशाला महाराष्ट्र काय चीज आहे हे दाखवणारा होता. लोकसभेला जी काही मतांची साथ तुम्ही सुप्रिया सुळेंना दिली त्यांना मोठ्या मताधिक्यांनी जिंकून दिलं. आता विधानसभेची निवडणूक होत असून त्यामध्येही काळजी घेण्याची गरज आहे असं सांगत शरद पवार म्हणाले की, "ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. बहिणीचा सन्मान करायचा असेल तर माझी काही तक्रार नाही. बहिणीला महत्त्व द्यायचं असेल तरी माझा त्याला विरोध नाही.
पण एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला बहिणीची अवस्था काय आहे? आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये महिलांवर अत्याचार किती झाले याची आकडेवारी तुम्हाला सांगू का? पोलिस स्टेशनमध्ये ज्या नोंदणी केल्या आहेत महिलांवरील अत्याचाराच्या त्या आपल्या राज्यामध्ये 67,381 आहेत आणि 64 हजार मुली आज महाराष्ट्रामध्ये बेपत्ता आहेत ही लाजिरवानी गोष्ट नाही का? एकीकडे लाकडी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला ही स्थिती. त्यांच काय झालं त्यांच्या रक्षणाची जबाबदारी कोणाची त्यांच रक्षण करण्याची धमक यांच्यात नाही म्हणून आज महाराष्ट्रत महिलांची ही गंभीर अवस्था आहे.
आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे?- शरद पवार
दुसरीकडे बारामती हा शेती करणाऱ्या लोकांचा भाग आहे. शेतकरी हा महत्त्वाचा घटक असला तरी शेतऱ्यांची परिस्थिती आज महाराष्ट्रात काय आहे? ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या काळात 20 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. काय गुन्हा होता त्यांचा? कशासाठी आत्महत्या केली? असा भावनीक प्रश्न शरद पवारांनी केला.
तर पुढे शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच कारण हे शेतमालाची किंमत मिळत नाही. राज्यसरकारच्या धोरणांमुळे ते कर्जबाजारी झाले. मोदींच्या सरकारने देशातील 16 उद्योगपतीचे 18 हजार कोटींचे कर्ज माफ केलं. लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढतील सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला होता. आता अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्याची लढत सुरू आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.