मविआमध्ये वाद, नाना पटोलेंना धक्का? काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा मोठा निर्णय

मविआमध्ये वाद, नाना पटोलेंना धक्का? काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा मोठा निर्णय

जागावाटपामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बाजूला करून आता समन्वयाची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे.
Published by :
shweta walge
Published on

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू असतानाच काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीला गेले होते. जागा वाटपामध्ये आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मोठा निर्णय घेतला आहे. जागावाटपामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बाजूला करून आता समन्वयाची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये विदर्भातील जागांवरून सातत्याने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत असल्याने जागावाटपाची चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही. यामुळे महाराष्ट्रातल्या उमेदवार निवडीसाठी आणि मविआतल्या वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस हायकमांड आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com