महाविकास आघाडीचे जागावाटप आज जाहीर होण्याची शक्यता; कोणाला किती जागा मिळणार?

महाविकास आघाडीचे जागावाटप आज जाहीर होण्याची शक्यता; कोणाला किती जागा मिळणार?

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाविकास आघाडीकडून पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळत असून पहिल्या टप्प्यात किती उमेदवार जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. विदर्भातील 12 जागांवर काँग्रेस-ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तिढा असल्याची माहिती मिळत आहे.

विदर्भातील 12 जागा वगळून उर्वरित जागांचं वाटप आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये कोणाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com