Sanjay raut critising on Raj Thackeray
Sanjay raut critising on Raj ThackerayTeam Lokshahi

राज ठाकरे यांना बाळासाहेब माफ करणार नाहीत- संजय राऊत

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, असे राज ठाकरे नुकतेच कल्याण ग्रामीण येथील जाहीर सभेत म्हणाले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा आज शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण येथे घेतलेल्या सभेत जोरदार फटकेबाजी केली. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, असे राज ठाकरे नुकतेच कल्याण ग्रामीण येथील जाहीर सभेत म्हणाले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा आज शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.

''राज ठाकरे जे बोलत आहेत, तीच बाब आम्ही दोन वर्षांपासून सांगत आहोत. शिवसेना, शिवसैनिक, धनुष्यबाण ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह कोण आहेत? त्याच मोदी-शाहांची तळी राज ठाकरे आज उचलत आहेत. राज ठाकरेंचा हल्ला मोदी-शाहांवर असायला हवा'', अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.

संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

'राज ठाकरेंना राज्यात भाजपचा मुख्यमंत्री हवाय'

शिवसेना शिंदेंना देणाऱ्या पक्षाचा राज ठाकरेंकडून प्रचार

राज ठाकरेंना बाळासाहेब माफ करणार नाहीत-राऊत

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या हल्लाबोल केला आहे. 'राज ठाकरे यांना राज्यात भाजपचा मुख्यमंत्री हवा असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. शिवसेना शिंदेंना देणाऱ्या पक्षाचा राज ठाकरेंकडून प्रचार केला असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. राज ठाकरेंना बाळासाहेब माफ करणार नसल्याचे वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.

दरम्यान, "माहीममध्ये महेश सावंत यांचाच विजय होईल. महेश सावंत 15 ते 20 हजार मतांनी विजयी होतील", असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचा 7 वेळा विजय झाला तरीही काँग्रेसने ही जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव असल्याची खंत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांना भाजपचा मुख्यमंत्री हवा असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com