Sana Malik Nawab Malik: नवाब मलिक,सना मलिक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, "या" मतदारसंघातून लढणार निवडणूक
विधानसभा निवडणूक पुढच्या महिन्यावर आली आहे. यावर अनेक पक्षांनी आपल्या हालचालींना सुरुवात केली आहे. बैठकी तसेच अनेक चर्चांना उधान येताना दिसत आहे. अशातच अजित पवार गटातील नवाब मलिक आणि त्यांची कन्या सना मलिक दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून नवाब मलिक मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढणार, तर सना मलिक अणुशक्ती नगरमधून रिंगणात उतरणार आहेत.
नवाब मलिक 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्याचसोबत सना मलिक 23 तारखेला अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या घड्याळाच्या चिन्हावर नवाब मलिक आणि त्यांची कन्या निवडणूक लढणार आहेत. नवाब मलिक हे क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत येताना दिसले त्यावर आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते ईडीने कारवाईमुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं.
यानंतर ते नवाब मलिक यांची कंपाऊंड प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती आणि त्यादरम्यान 2022 ला त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर ते 2023 च्या ऑगस्टला जामिनावर तुरुंगातून बाहेर देखील आले होते. यानंतर अजित पवार यांनी बंड केल्यानंतर नवाब मलिक अजित पवार यांच्या पक्षात जाणार की शरद पवार यांच्यासोबत राहणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र ते आता लेकीसह अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.