Sameer Wankhede vidhansabhaelection | समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात ? कोणत्या पक्षाकडून लढणार ?
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबंरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे आणि विधानसभेचा अंतिम निकाल हा 23 नोव्हेंबंरला जाहीर केला जाणार आहे. राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु झालेली पाहायला मिळत आहे. केंद्र निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता सर्व पक्ष बैठकी घेण्यासाठी तयारीत लागलेले आहेत या बैठका सगळ्याच पक्षांमध्ये होत आहेत. केंद्रीय निवडणुक समितीच्या बैठकीत आता अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
अशातच समीर वानखेडे करणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच समोर आलं आहे. समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असून ते शिवसेनेकडून निवडणूक लढणार तर वानखेडेंना धारावीतून मैदानात उतरवण्याच्या हालचाली पक्षाकडून सुरु आहेत. आता समीर वानखेडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतुन विधानसभा लढण्याची शक्यता आहे. धारावीमधून समीर वानखेडे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याच समोर आलं आहे. तर वादग्रस्त ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. समीर वानखेडे महायुतीकडून निवडणूक लढणार विधानसभा रिंगणात समीर वानखेडे शिंदे गटाकडून लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याचपार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार प्रतिक्रिया देत म्हणले, "धनाड्याबरोबर धनाड्य माणूस जात आहे. दोघांकडे ही असलेला काळ्या धनाचा हिशोब जनता निवडणूकीमध्ये करेल. तो कसा कारायचा हे जनता ठरवेल". तसेच संजय शिरसाट म्हणाले की, "समीर वानखेडे धारावीमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने तर्फे लढण्याच्या मनस्थितीत आहेत. परंतु ही बातमी आहे वस्तुस्थिती आत्तापर्यंत तशी नाही. लढवणार असतील तर त्याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. परंतू आत्तापर्यंत आम्ही त्यांना उमेदवार म्हणून पाहिलेलं नाही".