Sada Sarvankar In Mahim: राज ठाकरेंनी भेट नाकारल्यामुळे, आता सदा सरवणकर अमित ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवणार
विधानसभा निवडणुकीचं बगुल आता सुरु आहे. अनेक पक्षांनी आपल्या प्रचाराची देखील सुरुवात केली आहे. अशामध्ये आता अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या प्रक्रिया सुरु आहेत. अशातच सदा सरवणकर हे देखील आपला अर्ज मागे घेणार होते, यासाठी ते राज ठाकरेंची भेट घेण्यास निघाले होते मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारली असल्याचं सरवणकर म्हणाले.
पुढे सदा सरवणकर म्हणाले, मी महायुतीचा उमेदवार आहे आणि त्यामुळे महायुतीचे सर्व नेते हे महायुतेचे उमेदवार म्हणून मला पाठिंबा देतील. तर माहिमध्ये महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर, राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते गेले होते. मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारल्याचं सदा सरवणकर म्हणाले त्यामुळे मी निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सदा सरवणकर म्हणाले.
त्यामुळे आता अमित ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं सदा सरवणकर म्हणाले. माहिम मधील निवडणूक तिरंगी होणार, ठाकरेंच्या शिवसेनेतून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेमधून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहिमच्या रिंगणात उतरणार आहेत, तर आता महायुतीमधून सदा सरवणकर आता माहिमच्या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेण्यास आता नकार दिला आहे.