उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनानंतर रिपाईची नाराजी दूर
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारी यादी जाहीर केली जात आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. यामध्ये महायुतीचे मित्र पक्ष असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी महायुतीकडून कोणत्या जागा दिल्या जातील याबाबत आता निर्णय झाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची नाराजी दूर झाली आहे. धारावी आणि कलिना अशा दोन जागा रिपाईच्या वाट्याला दिल्या असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. महायुतीला विजयी करण्यासाठी प्रचाराला लागा असे रामदास आठवले यांनी निर्देश दिले आहेत.
महायुतीची सत्ता आल्यानंतर एक विधानपरिषद सदस्यत्व मिळणार आहे. तसेच राज्यात एक कॅबिनेट मंत्रीपद आणि 4 महामंडळ अध्यक्षपदे देणार असल्याचे रामदास आठवले यांनी माहिती दिली आहे. रिपाइला महामंडळ संचालक पदे, जिल्हा तालुका शासकीय कमिटी सदस्य पदे मिळणार आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा देणार असल्याचीही माहिती मिळत आहे.