सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून रोहित पवार यांच्या 'या' वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यातच आता सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
रोहित पवार म्हणाले की, देशमुख परिवाराचा काम हे तसं मोठे आहे या भागामध्ये. त्यांचं कार्य मोठं असल्यामुळे याच्याआधीसुद्धा त्यांच्याप्रचारासाठी नाही तर त्यांच्या एका सभेसाठी मी गेलो आहे, पवार साहेब गेलेले आहेत. आता आमच्या नेत्यांचे माहित नाही.
उद्या जर वेळ पडली तिथे मी बाबासाहेब देशमुखांना फार जवळून ओळखतो. त्यांनी जर मला बोलावलं तर नक्कीच मी त्यांच्या प्रचारासाठी मी जाईन. शेवटी एक दोन ठिकाण अशी आहेत की जिथे ज्या गोष्टी घडायला नको पाहिजे होत्या त्या घडल्या.
मात्र तरीसुद्धा जे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे नेते आहेत ते पुढच्या काही दिवसांमध्ये काही प्रमाणात नक्कीच त्या त्या 3-4 मतदारसंघाचा विचार करतील. मोठं मन दाखवतील आणि सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो. असं रोहित पवार म्हणाले.