Ravi Raja: मुंबईत काँग्रेसला धक्का; रवी राजा यांचा भाजपात प्रवेश
थोडक्यात
मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते भाजपच्या गळाला.
काँग्रेस नेते रवि राजा भाजपमध्ये करणार प्रवेश.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अनेक पक्षाच्या उमेदवारी यादी देखील जाहीर झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक ही 20 नोव्हेंबंरला असून त्याचा निकाल हा 23 नोव्हेंबंरला लागणार आहे. याचपार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे पक्षांतर होताना पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा भाजपच्या गळाला लागले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष शेलारांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते रवी राजा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असून काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. रवी राजा यांनी मल्लिकार्जुन खर्गेना राजीनामा पत्र पाठवले. रवि राजा हे सायन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. काँग्रेस नेते आणि बीएमसीतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत.