Raj Thackeary: माझा आमदार विकणारा नव्हता टिकणारा होता... राज ठाकरेंची अजित पवारांवर टीका
"कालच दिवाळी संपली आहे आजपासून आमचे फटाके" मी आज जो आलोय ते केवल तुमच दर्शन घेण्यासाठी आलो आहे. जिथे जिथे मनसेचे उमेदवार असतील तिथे तिथे त्यांना बहूमतांनी निवडून द्यायचं आहे. गेले पाच वर्ष आपण हा महाराष्ट्र पाहतो आहे. 2019 ला ज्यांनी मतदान केल मग ती युती असेल नाही तर आघाडी असेल पहिल्यांदा युतीमध्ये कोण होत? आणि आघाडीत कोण होत? आता या दोघांमध्ये ही कोण आहे? तुमच मत तुम्ही ज्यांना कोणाला दिल असेल मग ते युतीला दिल असले किंवा आघाडीला दिलं असेल आता सांगून दाखवा तुमच मत नक्की आहे कुठे? आमचा राजू सभेमध्ये एकटा होता आणि मला त्याच्याबद्दल अभिमान आहे "माझा आमदार विकणारा नव्हता टिकणारा होता" नाही तर सहज माझी निशाणी घेऊन दुसरीकडे बसला असता,
एकटाच तर होता पण असल्या गोष्टी माझ्या सहकर्यांच्या डोक्याला कधी शिवला नाही. शिवसेना आणि भजप त्यांच्या समोर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष 2019 ला निवडणूका झाल्या. निकाल लागले मग एक सकाळचा शपथ विधी झाला ते लग्न 15 मिनिटात तुटल. कारण काकांनी डोळे वटारले मग लगेच आले घरी. काका मला माफ करा मग ज्यांच्या विरोधात निवडणूका लढवल्या होत्या कॉंग्रेस आणि रष्ट्रवादीच्या बरोबर त्यांच्या बरोबर जाऊन उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर जाऊन बसले आणि सांगितल की, मला अमित शाहांनी सांदितल होत अडीच वर्षांच मुख्यमंत्रीपद याची हमी आम्ही तुम्हाला देतो. कोठे झाले 4 भिंतीत. मी मागे म्हटलं होत, उद्धव ठाकरे व्यसपिठावर असताना मी त्यांच्या समोर म्हटलं होत. नरेंद्र मोदींनी सांगितल होत की, आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.