Raj Thackeray Dombivli Sabha: शिंदे, ठाकरे ते पवार! पहिल्याच सभेत, राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी
डोंबिवलीतून राज ठाकरेंच्या प्रचारा दरम्यान राज ठाकरेंकडून चिन्ह आणि पक्ष नावावरुन संतापजनक वक्तव्य. आमचा राजू सभेमध्ये एकटा होता आणि मला त्याच्याबद्दल अभिमान आहे "माझा आमदार विकणारा नव्हता टिकणारा होता" नाही तर सहज माझी निशाणी घेऊन दुसरीकडे बसला असता, एकटाच तर होता पण असल्या गोष्टी माझ्या सहकर्यांच्या डोक्याला कधी शिवला नाही. शिवसेना आणि भजप त्यांच्या समोर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष 2019 ला निवडणूका झाल्या. निकाल लागले मग एक सकाळचा शपथ विधी झाला ते लग्न 15 मिनिटात तुटल. कारण काकांनी डोळे वटारले मग लगेच आले घरी. काका मला माफ करा मग ज्यांच्या विरोधात निवडणूका लढवल्या होत्या कॉंग्रेस आणि रष्ट्रवादीच्या बरोबर त्यांच्या बरोबर जाऊन उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर जाऊन बसले आणि सांगितल की, मला अमित शाहांनी सांदितल होत अडीच वर्षांच मुख्यमंत्रीपद याची हमी आम्ही तुम्हाला देतो. कोठे झाले 4 भिंतीत. मी मागे म्हटलं होत, उद्धव ठाकरे व्यसपिठावर असताना मी त्यांच्या समोर म्हटलं होत. नरेंद्र मोदींनी सांगितल होत की, आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.
"वेगळ्या विचारांची युती, वेगळ्या विचारांची आघाडी" सर्वात लाजिरवानी गोष्ट म्हणजे, उद्धव ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्यावर सगळ्या फोटोंवरुन सन्मानीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावा पुढचं हिंदूहृदयसम्राट ही गोष्टच काढून टाकली. शिवसेनेचे काही होल्डिंग उर्दूमध्ये होते ज्याच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या अगोदर "जनाब" हे लिहलेलं असायचं. स्वतःच्या नावासाठी स्वतःच्या खुर्चीसाठी एवढे खाली गेलात तुम्ही? मी आता मध्ये विधानभवनात गेलो होतो तेव्हा बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होत. त्यावेळेस मी तिथे सांगितल होत बाळासाहेबांच एक पेंन्टींग एक विधानभवनाच्या गॅलेरीत लावा आणि एक विधान परिषदेच्या गॅलेरीत लावा म्हणजे यांना समोल आपण आज इथे कोणामुळे आहोत ते. मग हे गेले कॉंग्रेससोबत आणि यांचे खालच्या खाली 40 गेले.
हे 40 जण घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते तेव्हा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बसण आणि त्यात अजित पवारांसोबत बसण मला श्वास घेता येईना. इथे अचानक कळलं मांडीवर येऊन अजित पवार बसले. कोणत राजकारण सुरु आहे? महाराष्ट्राचं भवितव्य हे आहे. मुख्यमंत्र्यांच्या एका व्यासपिठावर एक बाई भोजपुरी गाण्यावर नाचते आहे. ही लाडकी बहिण योजना असा महाराष्ट्र नव्हता आपला. इथे आपले तरुण तरुणी नेकऱ्या शोधत आहेत. आपले शेतकरी मरमर राबत आहेत. तरी यांची मज्जा चालू आहे.
हे फोडाफोडीचं राजकारण करणारे आपले शरद पवार पहिल्यांदा कॉंग्रेस फोडली. मग शिवसेना फोडली, 2005 ला परत नारायण राणेंना फोडल तिथे परत आमदार फोडले, आता फोडाफोडीवर राजकारण राहिल नाही. आता पक्षचं ताब्यात घ्यायचा तुमची निशाणीच ताब्यात घ्यायची. तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला आंदार फोडाफोडीच राजकारण करायचं आहे तुम्ही करा. माझे किती ही मतभेद असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवारांच आहे हे अजित पवारांच नाही आहे. अशा पक्ष, चिन्ह आणि माणस पळवण्याच्या गोष्टी उत्तर बिहारमध्ये होतात महाराष्ट्राचा उत्तर बिहार करायचा आहे का?