मनसेचे दोन शिलेदार रिंगणात, राज ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर

मनसेचे दोन शिलेदार रिंगणात, राज ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडून विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
Published by :
shweta walge
Published on

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. ठाण्यातून अविनाथ जाधव आणि कल्याण ग्रा. राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 24 ऑक्टोबरला दोघही भरणार अर्ज असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

कल्याण शिळ रोडवर मानपाडा चौकात राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी राज ठाकरे यांनी ही अधिकृत घोषणा केली.

यावेळी ते म्हणाले की, उमेदवारी यादीवर शेवटचा हात फिरवला जातोय, आज किंवा उद्या दुसरी यादी जाहीर होईल, त्याआधीच कल्याण ग्रामीणसाठी राजू पाटील आणि ठाणे विधानसभा मतदार संघासाठी अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले, तसेच येत्या 24 तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचा फॉर्म भरण्यासाठी येणार असून तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने फॉर्म भरण्यासाठी यावं असे आवाहन राज ठाकरे यांनी उपस्थितांना केले.

दरम्यान, महायुती मनसेला बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील काही जागांवर महायुती बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे, फडणवीस, राज ठाकरेंमध्ये पाठिंब्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री चर्चा झाल्याचे बोलले जात असून शिवडी, वरळी, माहीमसह काही मतदारसंघांबाबत चर्चा झाली असून आता महायुती मनसेला बिनशर्त पाठिंबा देणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com