Pruthviraj Chavan: कराडमधून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव
काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा मतदारसंघ कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय झाल्यामुळे चव्हाण यांच्यावर नामुष्की ओढावली आहे. भाजपकडून भाजपच्या डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांच्यासोबत चव्हाणांची लढत होती.
भाजपच्या डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांचा 114205 मतांनी विजय झाला आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांना 89398 मते मिळाली आहेत. १५ व्या फेरीतील ही आकडेवारी आहे. चव्हाण यांचा साधारण २५ हजार मतांनी पराभव झाला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे. त्याच्या विरोधात भाजपाचे अतुल भोसले निवडणूक लढवित होते. अतुल भोसले मतमोजणी सुरु झाल्यापासून सुरुवातीपासून आघाडीवर होते. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात कायम कॉंग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. येथून सात वेळा कॉंग्रेसचा विजय झालेला होता. भाजपच्या डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांचा 114205 मतांना विजय झाला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. महायुती आघाडीवर असल्यामुळे राज्यात महायुती सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. साल २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहायला मिळाले. राज्यातील महत्त्वाचे असलेले दोन पक्षांना फुटीचा सामना करावा लागला.