निवडणुकीच्या धामधुमीत गेल्या 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यात गेल्या 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत 15 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 90 कोटी 74 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. तसेच त्यापैकी गेल्या 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 19 अंमलबजावणी यंत्रणांनी एका दिवसात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कामगिरी बजावली आहे. विविध ठिकाणी पोलिस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पद्धतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.
पाहा कोणत्या विभागाने किती मालमत्ता जप्त केली?
इन्कमटॅक्स डिपार्टमेंन्ट - 30 कोटी 93 लाख 92 हजार 573
रेव्हयून्यू इन्टेलिजन्स - 8 कोटी 30 लाख 84 हजार 878
राज्य पोलीस डिपार्टमेंट - 8 कोटी 10 लाख 12 हजार 811
नार्कोटिस्ट कंन्ट्रोल ब्युरो - 2 कोटी 50 लाख
राज्य उत्पादन शुल्क विभाग - 1 कोटी 75 लाख 392
कस्टम डिपार्टमेंट - 72 लाख 65 हजार 745