मोहम्मद पैगंबर व देवतांबद्दल अपमान केल्यास... : प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुसलमान समाजाला मतदानासाठी साद घातली आहे. तसेच देव देवतांबद्दल वाईट शब्दाचा प्रयोग केल्यास फौजदारी कारवाई करण्यासाठी कायद्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
थोडक्यात
प्रकाश आंबेडकर यांची मुसलमान समाजाला साद
मोहम्मद पैगंबर व देवदेवतांबद्दल वाईट शब्दाचा प्रयोग केल्यास फौजदारी कारवाई करण्यासाठी कायद्याची गरज
कायद्यात सात वर्षाची शिक्षा तरतूद करणार असल्याचं वक्तव्य
एकीकडे साजिद नुमानी यांनी मुसलमान समाजाने महाविकास आघाडीला मतदान करावे असं जाहीर आव्हान केलं आहे. तर आज वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मुसलमान समाजाला साद घातली आहे. मोहम्मद पैगंबराच्या नावानं यावेळेस मुसलमान समाजांना आम्हाला मतदान द्यावं. मुसलमान समाजांना मतदान दिल्यास आम्ही सरकार स्थापन करु शकतो. अशी परिस्थिती आहे आमचं सरकार आल्यास आम्ही मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कोणीही वाईट लिखाण करणार नाही. यासाठी कायदा तयार करू. त्या कायद्यात सात वर्षाची शिक्षा तरतूद करणार आहोत. त्यामुळे नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी वाईट लिखाण केलं होतं. या कायद्यामुळे त्यांना शिक्षा करता येणार असल्याचं म्हटलं आहे.
मोहम्मद पैगंबर व इतर देवदेवतांबद्दल वाईट शब्दाचा प्रयोग केल्यास फौजदारी कारवाई करण्यासाठी कायद्याची गरज असून वंचित उमेदवार सत्तेत गेल्यास याबाबतचा कायदा आणणार असल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी भुसावळ येथील जाहीर सभेत केले आहे. भुसावळ येथील वंचितचे उमेदवार जगन सोनवणे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा घेण्यात आली.