PM Modi in Dhule: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले 'हे' काम करणार, नरेंद्र मोदींनी सांगितले...

PM Modi in Dhule: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले 'हे' काम करणार, नरेंद्र मोदींनी सांगितले...

धुळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची जाहीर सभा झाली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर टीका करत जोरदार भाषण केलं.
Published by :
Team Lokshahi
Published on

धुळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची जाहीर सभा पार पडल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावी अशी मागणी अनेक दशकापासून जनतेची होती. पण काँग्रेस वर्षानुवर्ष सत्तेवर असून देखील मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा दिला, इतके वर्ष जे काम काँग्रेस सत्तेत असून देखील करू शकल नाही, ते नरेंद्र मोदी यांनी कसे केले हा प्रश्न आता त्यांना पडला आहे. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार जोरदार काम करत आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिली पसंत राहिली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी धुळ्यात सांगितले.

तसेच पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, ज्यावेळी मी महाराष्ट्रात वाढवण बंदराचे उद्घाटन केले होते, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी त्याठिकाणी एक विमानतळ करावे अशी इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली. मी महाराष्ट्राच्या जनतेला हे वचन देतो की, ज्यावेळेस महायुती सरकारचा शपथविधी होईल आणि महायुती सरकार महाराष्ट्रात येईल त्यानंतर राज्यसरकार बरोबर आम्ही बैठक घेऊन वाढवण बंदराजवळ नवीन विमानतळाचा निर्णय घेण्याबाबत चर्चा करु. महायुतीच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात अनेक विकासाची कामे करण्यात आली आहेत. महायुती असताना राज्यात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक झाली या दरम्यान महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत दोन वर्षे प्रथम ठरला.

तसेच मविआवर टीका करत मोदी म्हणाले, महिलांसाठी सुरु करण्यात आलेली लाडक्या बहीण योजनेची देशभरात चर्चा सुरु आहे. मात्र ती मविआला सहन होत नाही. त्यामुळे काँग्रेससोबत मिळून ही योजना बंद कशी करता येईल यासाठी त्यांनी अनेक कारस्थान रचली. यासाठी ते कोर्टात देखील पोहचले मविआची सत्ता महाराष्ट्रात आली तर ते पहिल लाडकी बहिण योजना बंद करतील असं नरेंद्र मोदी म्हणाले. मविआचे लोक महिलांसोबत कशा प्रकारे बोलतात त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे अभद्र शब्द वापरतात हे आता सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे आमच्या बहिणींचे जीवन चांगले बनवण्यासाठी आणि महिलांना पुढे जाण्यासाठी आम्ही सर्व दरवाजे उघडले, असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com