PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात महायुती सरकार स्थापन करणार आहे. साल २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहायला मिळाले. राज्यातील महत्त्वाचे असलेले दोन पक्षांना फुटीचा सामना करावा लागला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जनतेचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं होतं. मात्र, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालं आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयानंतर जनतेला संबोधित केलं.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाजप मुख्यालयातून संबोधित केलं. महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. निकालानंतर काँग्रेस पूर्णपणे परजीवी झाल्याचे आता सिद्ध झाले आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेस यापुढे कधीही स्वबळावर जिंकू शकत नाही. भारतातील सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
महाराष्ट्रात महायुतीचं यश निश्चित झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही पोस्ट करून शुभेच्छा दिल्या. पाहा काय म्हटले पंतप्रधान मोदी-