पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघापैकी 'या' 8 मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार

पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघापैकी 'या' 8 मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर असून निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघापैकी 8 मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार असे चित्र पाहायला मिळत आहे.

आठ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार असून जिल्ह्यातील निवडणुकीची रंगत वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुणे जिह्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

बारामती - अजित पवार (अजित पवार) विरुद्ध यूगेंद्र पवार (शरद पवार)

हडपसर - चेतन तुपे (अजित पवार) विरुद्ध प्रशांत जगताप (शरद पवार)

वडगाव शेरी - सुनील टिंगरे (अजित पवार) विरुद्ध बापू पठारे (शरद पवार)

आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (अजित पवार) विरुद्ध देवदत्त निकम (शरद पवार)

जुन्नर - अतुल बेनके (अजित पवार) विरुद्ध सत्यशील शेरकर (शरद पवार)

इंदापूर - दत्ता भरणे (अजित पवार) विरुद्ध हर्षवर्धन पाटील (शरद पवार)

शिरूर - ज्ञानेश्वर कटके (अजित पवार) विरुद्ध अशोक पवार (शरद पवार)

पिंपरी - अण्णा बनसोडे (अजित पवार) विरुद्ध सुलक्षणा शिलवंत (शरद पवार)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com