Pankaja Munde Parli Vidhansabha: पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंना साद; भावासाठी बहीण मैदानात

Pankaja Munde Parli Vidhansabha: पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंना साद; भावासाठी बहीण मैदानात

एकेकाळी एकमेकांमध्ये मतभेद तसेच राजकीय वैर असणारे बहिण भाऊ म्हणजेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे महायुतीच्या निमित्ताने अनेक वर्षांनी एकत्र आले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

सध्या राजकीय वर्तूळात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहे. लोकसभेला जे चित्र राजकीयवर्तूळात पाहायला मिळत होत तेच चित्र आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदलेलं दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. तर याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नात्यांमध्ये देखील बदलाव पाहायला मिळाले आहेत. काही नात्यांमध्ये फुट पाहायला मिळत आहे तर काही नात्यांमध्ये चांगले संबंध निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अशामध्ये एकेकाळी एकमेकांमध्ये मतभेद तसेच राजकीय वैर असणारे बहिण भाऊ म्हणजेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे महायुतीच्या निमित्ताने अनेक वर्षांनी एकत्र आले आहेत. ज्या घडाळ्यामुळे मुंडे भावा बहिणीमध्ये फुट पडली होती. त्याच घडळ्यानं महायुतीच्या माध्यमातून त्यांना एकत्र आणलं आहे. लोकसभेत धनंजय मुंडेंनी प्रचार केल्याचं पाहायला मिळाल पण आता विधानसभेला भावासाठी पंकजा मुंडे प्रचाराच्या मैदानात उतल्याचं पाहायला मिळत आहेत. तर या प्रचारा दरम्यान पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना साद घातली आहे.

यादरम्यान पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला माहिती आहे तुम्ही मतदान करताना कमळचं शोधणार आहात. मात्र आता कमळ दाबण्याऐवजी घड्याळ दाबा म्हणजे एक वेगळा अनुभव येईल. धनंजय घडाळ्यकडे गेल्यावर देखील काही लोकांनी कमळ दाबला तर ही समस्या आहे. आता असं वाटतं कमळच घेतल असत तर बर झालं असतं काय फरक पडणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com